उद्धव ठाकरेंची प्रकृती आता स्थिर ! उद्या होणार डिस्चार्ज
उद्धव ठाकरेंची प्रकृती आता स्थिर ! उद्या होणार डिस्चार्ज
img
दैनिक भ्रमर
राज्यात आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज तातडीने रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे हे सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांना उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान , सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे त्यांच्यावर अॅजियोग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची एन्जोप्लास्टी झाल्यावर त्यांना अंडर ऑब्झरवेशन ठेवले आहे.डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून उद्या सकाळी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group