विधानसभा निवडणूक : काँग्रेसची ५४ नावांची संभाव्य यादी तयार, बड्या नेत्यांना संधी , वाचा
विधानसभा निवडणूक : काँग्रेसची ५४ नावांची संभाव्य यादी तयार, बड्या नेत्यांना संधी , वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  भाजपने आघाडी घेत रविवारी आपल्या ९९ उमेदवारांच्या नावांसह पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीही आपली पहिली यादी जाहीर करेल असं वाटत असताना मविआत नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला असून उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली.

त्यामुळे मविआच्या घटकपक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला. शरद पवारांकडूनही मध्यस्थीचे प्रयत्न झाले. पण तेही निष्फळ ठरले. शिवसेना ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेण्याचा विचार करु असं सांगितलं. या सर्व घडामोडींनंतर आता काँग्रेसने मात्र आपले उमेदवार निश्चित केले असून काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

 एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने ५४ उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. या उमेदवारांच्या नावाची घोषणा ही मंगळवार २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या यादीतील काही प्रमुख उमेदवारांची नावंही समोर आली आहेत.

काँग्रेसची संभाव्य यादी

  1. नाना पटोले - साकोली
  2. विरेंद्र जगताप - धामणगाव
  3. यशोमती ठाकूर - तिवसा
  4. विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी
  5. अमित झनक - रिसोड
  6. नितीन राऊत - उत्तर नागपूर
  7. विकास ठाकरे - पश्चिम नागपूर
  8. रणजित कांबळे - देवळी
  9. सुभाष धोटे - राजूरा
  10. डॉ. सुनील देशमुख - अमरावती शहर
  11. बबलू देशमुख - अचलपूर

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group