मातोश्रीवर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, वाचा
मातोश्रीवर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, वाचा
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांमध्ये जवळपास  दीड तास चर्चा झाली आहे. जयंत पाटील मातोश्रीतून बाहेर आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही जागांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सुरु आहे. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसनेते वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावर मार्ग काढू अशी माहिती नेते देत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group