राजकीय :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पदाचा राजीनामा देणार?
राजकीय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पदाचा राजीनामा देणार?
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून महायुतीने दणदणीत विजय मिळविला आई\तर दुसरीकडे महाविकस आघडीच्या हाती मात्र निराशा आली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच सत्ता स्थापनेच्या हालचालींना देखील वेग आला आहे.

दरम्यान, राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group