ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट
ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट
img
दैनिक भ्रमर
काल राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती सरकारचा दणदणीत विविआज्य झाला आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या हाती मात्र निराशा आली आहे. निकाल लागल्यापासून राजकीय वर्तुळातील घडामोडींचा वेग आला आहे दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा सामंतांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, उदय सामंत यांनी सांगितले की, कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या विचारांवर आम्ही काम करतोय. फक्त गद्दार…गद्दार बोलून होत नाही, कामही करावं लागत असल्याचा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला. ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सामंत यांनी म्हटले. शिवसेना कोणाची मतदारांनी सांगितले असून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी म्हटले की, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. काल निकाल लागल्यानंतर रात्रीपासूनच काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंकडे सध्या 20 आमदार आहेत. त्यातील 2-3 आमदार सोडून बाकी सगळे आमदार आमच्याकडे येतील असा दावा सामंत यांनी केला.

दरम्यान, उदय सामंत यांनी सांगितले की, या आमदारांना कधी आणि कसा पक्ष प्रवेश द्यायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तूर्तास आमदारांची नावे जाहीर करणार नसून वेळ आल्यावर आमदारांची नावे समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी आता बडबड बंद करावी, अन्यथा उरलेले आमदारही आमच्याकडे येतील असा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group