मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ , नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ , नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
 मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय देणार आहे. मराठा आरक्षणासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारची धावपळ सुरू असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. मी एकदा शब्द दिला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगेंची पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. जरांगे सभेला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली. 

दरम्यान या सभेत मनोज जरांगे यांच्या भाषणावेळी एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या कृत्यानंतर स्टेजवर एकच तणाव पाहायला मिळाला. 
 
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातील राजगुरुनगर येथे जंगी सभा झाली. या सभेला मराठा समाजातील पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. जरांगे यांची सभा १०० एकरात पार पडली. या जंगी सभेत एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.  
  
नेमकं काय घडलं?
जरांगे यांच्या भाषणावेळी अचानक एक तरुण स्टेजवर आला. हा तरुण माईक हातात घेऊन आल्यानंतर मला बोलू द्या म्हणू लागला. मला बोलू दिले नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील तरुणाने दिली.

स्टेजवरील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढत बाजूला नेले. त्यानंतर स्टेजवर तरुण आणि जरांगे पाटील यांचा संवाद झाला. खुद्द जरांगे यांनीही त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group