भारताने न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
भारताने न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
img
दैनिक भ्रमर

भारताने न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली.भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केले आणि उपांत्य फेरी गाठली होती.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर अंतिम फेरीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आणि विजेतेपदावर नाव कोरलं.

न्यूझीलंडने अंतिम फेरीत विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून पूर्ण केलं. 12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group