Nashik : कारचे बक्षीस लागल्याचा व्हॉटस्‌‍अप वर मेसेज आला अन्‌‍ जेष्ठ नागरिक अडीच लाख घालवून बसला
Nashik : कारचे बक्षीस लागल्याचा व्हॉटस्‌‍अप वर मेसेज आला अन्‌‍ जेष्ठ नागरिक अडीच लाख घालवून बसला
img
Dipali Ghadwaje

नाशिक (प्रतिनिधी) :- नेक्सा कंपनीच्या चारचाकी वाहनाचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्याने एका वृद्धाला अडीच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अभिमन्यू नामदेव माळी (वय 62, रा. चैतन्य अपार्टमेंट, जगन्नाथ चौक, पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांना दि. 18 मे रोजी 8272988068 या व्हॉट्सॲप क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने मेसेज केला. त्यात नेक्सा कंपनीची चारचाकी गाडी बक्षीस लागल्याचे आमिष फिर्यादी माळी यांना दाखविले. त्यानुसार ही कार मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कारणांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक धारकाने त्यांना वेळोवेळी फोन पेद्वारे रक्कम भरण्यास लावली.

त्या अज्ञात इसमावर विश्वास ठेवून अभिमन्यू माळी यांनी दि. 18 ते 26 मे 2023 या कालावधीत अज्ञात इसमाने सांगितलेल्या वेगवेगळ्या फोन पे क्रमांकावर सुमारे 2 लाख 55 हजार 462 रुपयांची रक्कम भरावयास लावली; मात्र एवढे पैसे भरून कारचे बक्षीस मिळाले नाही, यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माळी यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group