दुर्दैवी : भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू
दुर्दैवी : भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी): पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे गाव येथे एका रिक्षाला भीषण अपघात झाला आहे. यात रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

या बाबत पोलिसांनी सांगितले की, उत्तम भानुदास शेजूळे (वय 42)राहणार जेतवन नगर, नाशिकरोड हे रिक्षाचालक मित्र रघुवीर सन्नीराम लोहट याच्या सोबत रिक्षा क्र MH 15FV 8928 मधून सोमवारी रात्री ढाब्यावर जेवण करण्यासाठी शिंदे गाव टोलनाकाच्या पुढे गेले होते. जेवण करुन पुन्हा ते घरी नाशिकरोडकडे येत असताना पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे गाव येथील त्रिमूर्ती प्लाझा समोर स्पीड ब्रेकरवर  चाललेल्या मालवाहतूक करणारा आयशर ट्रकला क्र MH 15 EG 1245 मागील उजव्या बाजूने धडक दिली.

त्यात रिक्षा पलटी झाल्याने त्याखाली सापडून उत्तम शेजूळे यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्याच्या पाच्यात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी त्याच्यावर देवळालीगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिकरोड पोलिसात या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार संतोष पाटील करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group