मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं, ठाकरे गटाच्या
मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं, ठाकरे गटाच्या "या" नेत्याला चांगलंच भोवलं
img
Dipali Ghadwaje
दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना चांगलंच भोवलं आहे.भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातच संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला जाणार आहेत.  

भांडूप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहेत. दत्ता दळवींना अटक का केली ? असा जाब पोलिसांना राऊत विचारणार आहेत.  

नेमकं प्रकरण काय ?
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. यावरून  शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.  .

इतर बातम्या
Join Whatsapp Group