मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका
मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या साफसफाईवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, भ्रष्टाचाराची सफाई करावी, असे वक्तव्य संजय राऊत म्हणाले.  

सर्व नाटक बंद केली पाहिजे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे.  मुंबई महापालिका निवडणुका आपण घेत नाही हे महापालिकेचे, नगरसेवकांचे काम आहे. ठाण्यामध्ये ,पुणे ,नाशिक 14 महानगरपालिका निवडणुका घ्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोंग, ढोंग करण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही ठाण्यातील नगरसेवक प्रमाणे आहे.  

महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांचं राज्य : राऊत
राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य, तीन घाशीराम कोतवाल राज्य करतायत, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. घाशीराम कोतवाल महाराष्ट्रात नाटक खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती . आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

तसेच यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय. यावर बोलताना मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये' येतात अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल चालतात पण मलिक का चालत नाहीत असा सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group