एसआयटी चौकशीवर जरांगेंनी दिली
एसआयटी चौकशीवर जरांगेंनी दिली "ही" प्रतिक्रिया; म्हणाले माझ्याविरोधात...
img
दैनिक भ्रमर
विधिमंडळात आज मनोज जरांगेंची भूमिका आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.


मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी लावण्यात आल्या. एवढे पैसे कोठून आले. मनोज जरांगे यांच्या आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर बैठका झाल्या, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. या आरोपांनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. यावरच मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, माझ्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली. मी गरीब मराठ्यांचे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तेचा वापर करत आहेत. त्यांना काय करायचं ते करू द्या. कारण माझा कोठेही दोष नाही. मी मागेच मराठा समाजाला सांगितलं की फडणवीसांसाठी मी एक काटा आहे. मला त्यांना गुंतवायचे आहे.

“मी कोठेही जायला तयार आहे. अरे तुम्ही कोणतीही चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मी भेकड असतो तर गप्प बसलो असतो. मी कोठेच गुंतू शकत नाही. मला कोणाचाही पाठिंबा नाही. मला कोणीही पैसे दिलेले नाहीत. मला कोणीही फोन केलेला नाही. तुम्ही एसआयटी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील. त्यांनी मला अनेकवेळा कॉल केलेले आहेत.

मग मी पण ते कॉल बाहेर काढतो. होऊन जाऊ द्या मग. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. माझ्यासाठी जात हे दैवत आहे. मला तुम्ही आता बोलावलं तरी मी सलाईन हातात घेऊन चौकशीसाठी येईल,” अशी भूमिका जरांगे यांनी घेतली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group