बेळगाव: तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाच भाविकांचा आंध्रप्रदेशमधील मथपल्ली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. क्रुझर वाहनाने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील सोळा जण हे क्रुझर वाहनातून तिरुपतीला गेले होते. तर या भीषण अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना कळवले. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रुझर वाहनातील जखमींना बाहेर काढून तिरुपती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान या अपघातात मृत झालेल्या पाच जणांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवले आहेत. हनुमंत अजुर (52), मनंदा अजुर (46), शोभा अजुर (36), अंबिका अजुर (19) आणि हणमंत जाधव (52) अशी मृतांची नावे आहेत.