'या' जिल्ह्याची चिंता वाढली ; जिल्ह्यातील ११ धरणे कोरडी ठाक
'या' जिल्ह्याची चिंता वाढली ; जिल्ह्यातील ११ धरणे कोरडी ठाक
img
दैनिक भ्रमर
उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील अकरा धरण कोरडी पडली. पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत उन्हामुळे आटू लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक तलाव, धरणे कोरडे पडल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. याशिवाय अकरा धरणे कोरडी आहेत, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांवर वणवण फिरण्याची वेळ आल्याचं दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील जवळपास अर्धी धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांमध्ये फक्त २० टक्के म्हणजेच ४१.१६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आता पुण्यात पुढील दीड ते दोन महिने पाण्याची भीषण टंचाई भासण्याची चिन्हे दिसत आहे.

पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यातील ११ धरणे कोरडीठाक

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणांतील पाण्याचा पुरवठा शेती तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना होतो. मार्च महिन्यापासून धरणातील पाण्याची मागणी वाढली होती. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने (Water Shortage) कमी झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या धरणांमध्ये एकूण ६६.५९ टीएमसी म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील टेमघर, कासारसाई, वडीवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली आहेत. यामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाझरे धरणातील मृतसाठाही संपुष्टात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group