दुर्दैवी...! अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; कुठे घडली घटना?
दुर्दैवी...! अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
वीजेचा झटका लागून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात मध्ये तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची धांदल उडाली आहे. अशातच रात्री 3 च्या सुमारास मुठा नदी जवळ झेड ब्रीज खाली पाणी साचल्याने 18-25 वर्षातील 3 तरूणांना वीजेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण भरल्याने तेथून पाण्याचा विसर्ग सुरू झालाआहे. अशात मुठा नदीला मोठा पुर आला आहे. काल रात्री मोठा पाऊस आल्याने आपला स्टॉल वाचवण्यासाठी 3 जण पुढे गेले. त्यामध्ये वीजेचा झटका लागून तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांची नावं अभिषेक अजय घाणेकर (वय २५, रा. पुलाच्या वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, नेपाळी कामगार) आहेत. पहाटे रात्री पाणी वाढल्याने आपली गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ते तिघेही पुन्हा गाडीवर गेले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत जात असताना अचानक त्यांना विजेचा शॉक बसला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान वीज प्रवाह बंद करून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिन्ही तरुणांना डॉक्टरांनी आज रोजी पाहते पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group