सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या. तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली गेली. समाजात अशांतता निर्माण करण्याच्या त्या घोषणा होत्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरातून सर्वधर्म समभाव मोर्चा काढला गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. त्यात थेट “सर तन से जुदा” करणाऱ्या घोषणा होत्या. सार्वजनिक शांततेचा भंग करुन समाजामध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे पुण्यात 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या मोर्च्यात सहभागी झालेल्या काही जणांची ओळख पटली आहे. त्यांची पोलिसांकडून आता चौकशी सुरु होणार आहे.
या विषयी अधिक माहितीअशी की , सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या यावेळी काही ठराविक लोकांनी “सर तन से जुदा” तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
दरम्यान , या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात बेकायदेशीर जमाव जमवून विनापरवानगी मोर्चा काढून, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्यामुळे २०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.