पावसाळा आणि रस्त्यांवरील खड्डे हे एक नाते तयार झाले आहे. रस्त्याच्या दर्जाहीन कामांमुळे एक, दोन पावसात रस्ते खड्डेमय होतात. त्यासंदर्भात अनेक वेळा तक्रार करुन त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु आता पुणे महानगरपालिकेने अनोखा योजना आणली आहे.
पुणेकरांना आता खड्ड्यांची तक्रार व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यास 24 तासांत खड्डा बुजविला जाणार असल्याचा दावा पुणे मनपाने केला आहे.
या क्रमांकावर फोटोसह पाठवा तक्रार
पुणे शहरातील नागरिकांना आता व्हॉट्सअॅपचा वापर करुन तक्रार दाखल करता येणार आहे. पुणे शहरात निर्माण झालेल्या रस्त्यावरील खड्डयांच्या फोटोंसह तक्रार करता येणार आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर 24 तासात महानगरपालिका करणार रस्त्यांची दुरुस्ती आहे. महापालिकेकडून शहरातील रस्त्या दुरुस्तीसाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. पुणेकरांना 9043271003 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. तसेच 020-25501083 या क्रमांकावर आपली तक्रार दाखल करता येणार आहे.
गेल्या तीन दिवसांतील खड्डयांची परिस्थिती
एकूण बुजविण्यात आलेले खड्डे -१२२४
पॅचवर्क करण्यात आलेले खड्डे – १५३
वापरण्यात आलेला काँक्रिट माल- ३६३ क्युबिक मीटर
वापरण्यात आलेला डांबरी माल- २५६ मेट्रिक टन
मुरलीधर मोहोळ यांचे आदेश
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , पुण्यात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामास आणखी वेग देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. पुणेकरांना खड्ड्यांपासून दिलासा देण्यासाठी महापालिकेत त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत शहरात खड्डे बुजवण्याचे आणि पॅच वर्कच्या कामाला वेग देण्याचे आदेश दिले.
खड्ड्यांवर पुणे पोलिसांनी नजर
पुणे शहरातील खड्ड्यांवर पुणे पोलिसांची नजर असणार आहे. पुणे शहरातील खड्डे बुजवा नाहीतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे महापालिकेचे अभियंते, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. पुण्यातील ३१७ जंक्शन वर तब्बल ५४४ खड्डे निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत आहे.