मंत्रिपदावरून शिवतारेंची खदखद , म्हणाले
मंत्रिपदावरून शिवतारेंची खदखद , म्हणाले "शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती पण..."
img
Dipali Ghadwaje
पुणे : महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी अजित पवार गटातील विविध नेते नाराज आहेत. नाराज नेते उघडपणे आपल्या पक्षाविरोधात भूमिका घेत असून नाराजी व्यक्त करत आहेत.

पुरंदरचे शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं. याबाबतचा दावाही त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र अखेरच्या क्षणी शिवतारे यांचा मंत्रीमंडळातून पत्ता कट झाला. त्यानंतर विजय शिवतारे यांनी मंत्रीपद नाकारण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

शपथविधी सुरू असताना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला, तरी माझं नाव आलं नाही. प्रचंड चीड आली. माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने विरोधात काम केल्याचाही आरोप केला. मंत्रीपद नाकारण्याबाबत विचारलं असता विजय शिवतारे म्हणाले की, त्यावेळी मला प्रचंड राग आला. माझ्या नाती टाहो फोडून रडतायत. तुम्ही एक दिवस आधी सांगितलं असतं तर आम्ही कुणीच आलो नसतो.

शेवटच्या क्षणापर्यंत आता नाव येईल, आता नाव येईल, अशी अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला पण नाव नाही आलं. हेच त्यांच्या घरात झालं असतं, अशा प्रकारे वागणूक मिळाली असती तर राग आला नसता का? माझी नातवंडं ओरडतायत, माझी प्रचंड चीड झाली, अशा शब्दांत शिवतारे यांनी खदखद व्यक्त केली.
 
Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group