शॉर्टसर्किटमुळे डंपरला‌ भीषण आग; कुठे घडली घटना
शॉर्टसर्किटमुळे डंपरला‌ भीषण आग; कुठे घडली घटना
img
Dipali Ghadwaje
खडकवासला : वारजे बहुली रस्त्यावर खडकवासला धरणाच्या कोपरा कोठी जवळ बुधवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. माती घेऊन निघालेल्या डंपरला सकाळी साडेनऊ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान या घटनेमुळे यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथून माती घेऊन डंपर MH13-CU5694 हा कुठे गावाच्या दिशेने जात होता. यावेळी खडकवासला फाटा सोडल्यानंतर गाडी चालू असताना डंपरच्या केबिन मधील वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.अशी माहिती डंपर चालक गोविंद चौरे यांनी दिली. 

या घटनेच्या वेळी चालत एकटा डंपरमध्ये होता. आग लागल्याचे समजताच त्याने डंपर बाजूला घेऊन चालक गाडीतून खाली उतरला. डंपरला आग लागल्यामुळे दोन्ही बाजूची वाहने मागे सुरक्षित अंतरावर थांबली होती. ही वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती.

या आगीमध्ये डंपरचे केबिन पूर्ण जळाले असून त्याचे पुढील टायर तसेच डिझेलची टाकी देतील सुरक्षित आहे. नागरिकांनी माहिती कळविताच पीएमआरडीएचा अग्निशामक घटनास्थळी पोहोचला त्यावेळी आग ही डंपरच्या चाकाच्या टायर पर्यंत आली होती. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग केल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. 
Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group