वसंत मोरेंच्या
वसंत मोरेंच्या "या" पोस्टने चर्चांना उधाण
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पुणे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी काल रात्री एक फेसबुक पोस्ट केली आहे.

त्यांच्या या पोस्टमुळे पुणे मनसेत सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. राज ठाकरे यांचे विश्वासू आणि पुण्यातील कट्टर मनसैनिक म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर पुण्यात मनसे पक्षाच्या विस्तारामागे देखील वसंत मोरे यांचा मोठा हातभार आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. 

पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले की, "एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो,".
इतर बातम्या
Join Whatsapp Group