नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं...! शेतकऱ्याने 'इतक्या' लाखांना खरेदी केला ‘किटली’
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं...! शेतकऱ्याने 'इतक्या' लाखांना खरेदी केला ‘किटली’
img
Dipali Ghadwaje
हौशेला काही मोल नाही अस म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपये मोजले आहे. ऑटो बाजारात आलिशान कार घ्यायची म्हटली तर 20 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते. येथे तर या शेतकऱ्याने 21 लाख रुपये देऊन ‘किटली’ खरेदी केला. 

अनेकांना वाटलं होतं की शेतकऱ्याने केटली विकत घेतली. पण केटली हे दुसरं तिसरं काहीही नसून  किटली नावाचा बैल आहे. शेतकऱ्याने या किटलीसाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे. या महागड्या किटली बैलाला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर बैलाच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे.

अशातच खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना एका बैलाची खरेदी केली आहे. एखाद्या आलिशान कारच्या किंमती इतकीच किंमत त्यांनी मोजली आहे.पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यांनी या बैलाचे स्वागत केले. सध्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.
Pune | ox | bull |
इतर बातम्या
Join Whatsapp Group