पुण्यातील
पुण्यातील "त्या" बड्या व्यावसायिकाच्या कार बाबत "ही" धक्कादायक माहिती आली समोर
img
दैनिक भ्रमर
पुणे :  पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याचदरम्यान काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. 
या मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच व विनानोंदणीच रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

दरम्यान, मुलाने सांगूइतलें की, मी कार चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही. वडिलांनीच पोर्श कार माझ्याकडे देत मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group