इगतपुरीत भीषण अपघातात ७ जण गंभीर जखमी
इगतपुरीत भीषण अपघातात ७ जण गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
इगतपुरी : वाडीवऱ्हेकडून अस्वलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने बेलगावकडून वाडीवऱ्हेकडे येणाऱ्या मॅक्झिमो गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात बेलगाव कुऱ्हे येथील ३ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी ९ वाजताझाला असून या अपघातात दत्तू लालू गुळवे (वय ३८), मंगला विठ्ठल शिंदे (वय ३२), मनीषा एकनाथ शिंदे (वय ३५), तुषार सावळीराम गवारी (वय १२),रेखा सावळीराम गवारी (वय २५), लक्ष्मी खंडू गवारी (वय २५), सविता सुनील साळवे ९वय ३५) हे जखमी झालेले आहेत.

यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group