राज्य सरकारकडून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठास ‘या’ जिल्ह्यात मंजुरी
राज्य सरकारकडून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठास ‘या’ जिल्ह्यात मंजुरी
img
Dipali Ghadwaje
देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होणार आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते, असे पालकमंत्री सामंत यांनी दूरदर्शन यंत्रणेच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ व शासकीय विधी महाविद्यालय असावे अशी मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील या दोन्ही मागण्या बुधवारी (दि. 3) मंजूर केल्या. सागरी महाविद्यालासाठी 500 ते 600 कोटी रुपये आणि विधी महाविद्यालयाला 25 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यालाही तत्त्वत: मान्य केले आहे. 

समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीता आता उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी सन्मानाची आहे. यासाठी 50 एकर जमीन देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकणदौऱ्यादरम्यान संबंधित घोषणा केली होती.

कोकणचा सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांतर्गत देशातील पहिले सागरी विदयापीठ रत्नागिरी येथे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाची घोषणा त्यांनी मेळ्यात केली होती. भारतातील पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही समुद्राशी संबंधित विषयांवर तपशीलवार सराव करू शकू. ज्यामध्ये त्याला समुद्रशास्त्र, इतिहास, नियम, दुरुस्त्या इत्यादी विषयांचा सराव समुद्रशास्त्रापासून करता येणार आहे, अशी माहीती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.



इतर बातम्या
Join Whatsapp Group