मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू चौपाटीवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू
मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू चौपाटीवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मुंबईत आज सकळपासूनच मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम  सुरू असताना दरम्यान ढगांच्या गडगटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस देखील सुरू आहे. या मुसळधार पावसातही जुहू चौपाटी येथे गणपती विसर्जन सुरू आहे. याचदरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

मुंबईतील जुहू चौपाटीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. ही वीज जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकांवर पडली. त्यानंतर या स्वयंसेवक तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आली. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group