बदलापूर घटनेप्रकरणी 3 पोलीस निलंबित;
बदलापूर घटनेप्रकरणी 3 पोलीस निलंबित; "हे" आहे कारण
img
दैनिक भ्रमर
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात पोलिसांकडूनही हलगर्जीपणा झाल्याची माहिती उघड झाली. मुलींवर झालेल्या अत्याचाराचा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर ते बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी पालकांच्या तक्रारीची त्वरित गंभीरतेने दखल घ्या ऐवजी पोलिसांनी त्यांना तब्बल १२ तास रखडवून ठेवले आणि १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली. या सर्व प्रकारामुळे पोलिसांसह गृह खात्यावर मोठा दबाव होता. गृहखात्याने याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group