अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! स्थानिकांकडून शिक्षकाला चोप
अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! स्थानिकांकडून शिक्षकाला चोप
img
दैनिक भ्रमर
वसई मध्ये  अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेप्रकरणी एका शिक्षकास अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीवर कथित विनयभंग करण्याचा आरोप करण्यात आला आहे .   दरम्यान , हि घटना उघडकीस आल्यावर स्थानिक नागरिकांनी त्याला रस्त्यावर विवस्त्र करुन चोप दिल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी  शिक्षकाला पोलिसांकडे घेऊन गेले आणि त्याला त्यांच्या स्वाधीन केले. मुलीने शिकवणीस जाण्यास नकार दिला असता पालकांनी मुलीला विचारले असता. हा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यानंतर पालिकांनी शिक्षकाकडे जाब विचारला. तसेच, स्थानिकांनी त्याला रस्त्यावर विवस्त्र करुन चोप दिल्याची माहिती आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की , पालकांनी शिकवणीस जाण्यास नकार देण्याचे कारण विचारले असता पीडितेने सांगितले की, सदर शिक्षक तिच्याशी असभ्य वर्तन करतो. आपण नकार दिला असतानाही त्याने आपले चुंबन घेतले. शिवाय, आपल्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा चुकीच्या प्रकारे त्याने आपणास स्पर्शही केला. पीडितेने सांगितलेला प्रकार लक्षात येताच पालक प्रचंड सांतपाले. त्यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन विनयभंग करणाऱ्या संशयित शिक्षकाचे वसई येथील ठिकाण शोधले आणि त्याला जाब विचारला. वय वर्षे 35 असलेल्या या तरुण शिक्षकास जाब विचारताना पालकांचे संतापाच्या भरात स्वत: वरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी त्यास माराहण सुरु केली.त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 

पालकांनी सदर शिक्षकास खेचत रस्त्यावर आणले आणि त्याल विवस्त्र करुन चोप दिला. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समजते. महिलांनी या शिक्षकास चपलेने झोडपले. घटनास्थळावरच त्याला इतका मार मिळाला की, त्याचा चेहरा आणि शरीर काळेनिळे पडले होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान , पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आपल्या जबाबात नमूद केले आहे की, शिक्षक तिचा शारीरिक छळ करत होता. त्याने तिचे जबरदस्तीने चुंबनही घेतले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्लासमध्ये सीसीटीव्ही नाही. आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. लवकरच क्लासमधील इतर विद्यार्थ्यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. संतापलेल्या नागरिकांना शांततेचे अवाहन करताना पोलिसांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे अवाहन केले. 
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group