जन्मदात्या बापाने आधी पत्नीला दारू पाजली आणि मग...
जन्मदात्या बापाने आधी पत्नीला दारू पाजली आणि मग...
img
दैनिक भ्रमर
पत्नीसोबत दारूची पार्टी करून तिचे भान गेल्यानंतर नराधम बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित 13 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासमवेत मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरात राहते. तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या बापाने पत्नीसोबत घरी दारुची पार्टी केली होती.

त्यानंतर पीडितेच्या आईची शुद्ध हरपली. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. नंतर हा प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिली.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. काही दिवसांनंतर पीडितेची मावशी त्यांच्या घरी आली होती. तेव्हा तिला मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे तिने तिची विचारपूस केली असता पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार मावशीला सांगितला.
हे समजताच मावशीला धक्काच बसला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group