खळबळजनक ! मुंबईतील हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
खळबळजनक ! मुंबईतील हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

 मुंबईतील हाजी अली दर्ग्याला  बॉम्बने उडवून देण्याची धमकी  मिळाली असून एकच खळबळ उडाली आहे .दरम्यान, ही धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध तारदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासह विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्यात येईल तसेच, जे कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालू अशी धमकी आरोपीने दिली. अज्ञात व्यक्तीने स्वत:ची पवन अशी ओळख सांगून हाजी अली कार्यालयात फोन केला. हा कॉल दिल्लीतून आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (42) यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2), 352, 353(2) आणि 353(3) अंतर्गत अज्ञात आरोपिविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मंगळवार आणि बुधवारी दोन वेगवेगळे मोबाईल वापरून दोन धमकीचे फोन केले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. 

प्राप्त माहितीनुसार, पहिला कॉल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या मोबाईलवर आला होता. हा कॉल संकेतस्थळावरून प्राप्त झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून हाजी अली परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group