खुशखबर...! आता मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार ;
खुशखबर...! आता मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार ; "हे" आहे कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : समृद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  आता आमणे येथून इगतपुरीला पोहोचायला फक्त ४० मिनिटे लागणार आहेत. कारण  समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार आहे. समृद्धीचा नवा टप्पा खुला झाल्यानंतर नाशिककरांचा मुंबईच्या दिशेकडील प्रवास सुकर होणार आहे.  

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबई ते नाशिक अंतर तब्बल एका तासाने कमी होणार आहे.  एका वृत्त संस्थेच्या  वृत्तानुसार, समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे, ठाणे हा ७६ किलोमीटरचा टप्पा खुला होणार आहे.  या नव्या टप्प्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

नव्या टप्प्यातून वाहनचालकांसाठी १२० केएमपीएच वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इगतपुरी ते संग्रीला रिसोर्ट हे अंतर ७६ किमी असून तुम्हाला ४० मिनिटात पोहोचता येणार आहे. 

सध्या या मार्गावर संग्रीला रिसोर्टवरून इगतपुरीला पोहोचायला १.३० तास लागतो. लवकर खुल्या होणाऱ्या टप्प्यात एक दुहेरी बोगदा आणि दरीतून जाणारी मार्गिका असणार आहे.  'शहापुरातील पुलाचंही काम सुरु आहे. या पुलाचा एक भाग ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल. या पुलाचा दुसरा भाग हा दोन महिन्यात पूर्ण होईल.  

जुना मुंबई-नाशिक महामार्गाचा विस्तार करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचा मानस आहे. या टप्प्यात वडपे ते माजीवाडा असा २३.५ किलोमीटरचा टप्पा आहे. 'या प्रकल्पाचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार आहे. या टप्प्यात मोठी वाहतूक कोंडी असते. या प्रकल्पाच्या कामादरम्यान, अवजड वाहतूक होत असलयाचे अनिल गायकवाड यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group