मुंबई : उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील आनंदेश्वर मंदिराबाहेर एका कारस्वाराने साधू दाम्पत्याला चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली येथील आनंदेश्वर मंदिर परमात येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे आणि मंदिरातील लोक घटनास्थळी पोहोचले होते.
नेमकं काय घडले?
मृत पती-पत्नी मंदिराबाहेर भीक मागून उदरनिर्वाह करत होते. आज पहाटे मंदिरात आलेल्या कारस्वाराने त्यांना जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या भीषण अपघातावेळी उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो तेथून फरार झाला. या घटनेत या दाम्पत्याचा मृत्यू झालाय.
कारचालकाने चिरडलं घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे आणि मंदिरातील लोक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चौकशी आणि शोध घेऊन आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती दिलीय.
आज २१ सप्टेंबर रोजी सकाळी एक व्यक्ती परमात येथील बाबा आनंदेश्वर मंदिरात मंगला आरतीसाठी गेला होता. तेथून परतत असताना तो गाडी रिव्हर्स घेत होता, तेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेले पती-पत्नी (निर्भय चंद उर्फ सीताराम आणि त्यांची पत्नी शांती देवी) यांना धडक बसली. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते.