कल्याण ग्रामीणमधील
कल्याण ग्रामीणमधील "या" १४ गावांचा , नवी मुंबई पालिकेत समावेश....
img
Dipali Ghadwaje
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समाविष्ट करण्या यावा अशी मागणी केली जात होती. गाव विकास समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती. 

अखेर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश आले असून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मूळ विभागाचे कामं संभाळून या १४ गावांचे अतिरिक्त कामकाज पाहायचे आहे.

  1. भंडार्ली
  2. पिंपरी गाव
  3. गोटेघर
  4. बंबार्ली
  5. उत्तरशिव
  6. नागाव
  7. नारिवली
  8. वाकळण
  9. बाळे
  10. दहिसर मोरी
  11. दहिसर
  12. निघू
  13. मोकाशीपाडा
  14. नावाळी

या गावांचा यामध्ये समावेश आहे. 14 गावांच्या मालमत्ता हस्तातरणाच्या कामाला 11 तारखेपासून होणार आहे. दरम्यान, याबाबतचे आदेश निघताच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group