नालासोपारा हादरले ! तरुणीवर सामूहिक बलात्कार
नालासोपारा हादरले ! तरुणीवर सामूहिक बलात्कार
img
दैनिक भ्रमर

राज्यात सध्या महिलांवरच्या अत्याचारच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  एकामागे एक घटना उघडकीस येत आहेत गेल्या काही दिवसांआधी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना  घडली . आता पुन्हा एकदा नालासोपारा येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे . 
 एका ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी तिने थेट पोलिसांत धाव घेतल्याने हा प्रकार उजेडात आला. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. बदलापूर  प्रकरण अजूनही चर्चेत असताना आता दुसरी घटना समोर आली आहे. नालासोपारा येथे ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार अकोले पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ६४, ७० (१) आणि ३५१ (२) अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र मोर्या (३१), प्रकाश सिंग (२६) आणि पंचराज सिंग (३५) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही कोर्टात सादर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या विषयी अधिक ममहिती अशी की , काही  दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात १७ वर्षी मुलीवर दोन जणांनी बलात्कार केला होता. पश्चिम उपनगरातील एका १७ वर्षीय मुलीची एक मैत्रीण नालासोपारा येथे राहते. या मैत्रिणीच्या निमित्ताने तिची एका स्टुडिओत काम करणाऱ्या सोनू नामक तरुणाशी ओळख झाली. या तरुणाला भेटायला गेलेल्या पीडितेवर तरुणासह त्याच्या मित्राने नगीनदासपाडा येथील निर्जनस्थळी बलात्कार केला. तिने याप्रकरणी तिच्या पालकांना घडला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group