शिक्षकाकडून १४ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार
शिक्षकाकडून १४ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

मुंबई : खासगी ठिकाणी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षकानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक धारावीत घडला. विद्यार्थ्याला  मोबाइलमध्ये पाॅर्न व्हिडिओ दाखवत, त्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 

धारावी पोलिसांनी खासगी शिकवणी शिक्षक मायतरी अशान्ना (वय 34) यला अटक केली आहे. मायतरी अशान्नाचे धारावीत माय ट्युटोरियल नावाचे खासगी क्लासेस आहेत. बदनामीच्या भितीने या विद्यार्थ्याने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र या घटनेनंतर हा विद्यार्थी मानसिक तणावाखाली होता. कुटुंबातील सदस्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने त्याबाबतची माहिती दिली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घटना समजताच नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठत या शिक्षकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी धारावी पोलिस अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group