वेगवेगळ्या कारणांवरून हत्या केल्याचे अनेक प्रकार सतत घडत आहेत . मुंबईतील धारावी परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून तरुणाने मित्राचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे अवघ्या 25 रुपयांसाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. दोघेही सोबतच कामाला जात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
धारावी परिसरात अवघ्या 25 रुपयांसाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणा विषयी अधिक माहिती अशी कि , ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्याचे नंतर खुनात रुपांतर झाले. मुंबई गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. मयत आणि आरोपी दोघेही उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी असून ते 7 दिवसांपूर्वीच कामानिमित्त मुंबईत आले होते. दोघेही कपड्याच्या कारखान्यात काम करत होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.