मोठी बातमी! शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा
मोठी बातमी! शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा
img
दैनिक भ्रमर
सध्या राज्याची झेड प्लस सुरक्षा शरद पवार यांना देण्यात आली आहे. मात्र आता केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठानेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरणतापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली आहे.

आजपासून सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदाकरण्याचे निश्चित करण्यात आलं. सध्या राज्यात सुरूअसलेल्या घडामोडींच्या  पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी येत असतात. मात्र बदलापूर प्रकरणानंतर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

Z+ सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना क्तीं दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना Z+ सुरक्षा दिली जाते. यात एक पोलीस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिल्या घेराव्यास एनएसजी जबाबदार आहे. दुसरा थर एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेला आहे.त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group