नाशिक : 2 लाख रुपयांची लाच मागून 1 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना लिपिकास लाचुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नरेंद्र किशोर खाचणे (वय 52), वरिष्ठ लिपीक नेमणूक सामान्य प्रशासन विभाग जळगाव (वर्ग ३) असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची स्थापत्य अभियांतीकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी खाचणे यांनी तक्रारदार यांचेकडे 2,00,000 रूपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे काल तक्रार दिली होती.
सदर लाच मागणीची पडताळणी केली असता खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती 1,80,000 रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव, Asi दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो. ह. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ. शैला धनगर, पोना किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो. कॉ. सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ. राकेश दुसाणे, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी केली.