सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर एक सर्वेक्षण करण्यात आला आहे .एका प्रतिष्ठीत माध्यम समूहाने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केला आहे. यात देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री यावरही सर्वेक्षण केले आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत. देशभरातील १.३६ लाखांहून अधिक लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३३ टक्क्यांहून अधिक लोकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
दरम्यान , या सर्वेक्षणात सीएम योगी यांची सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.
सर्वेक्षणात, योगी आदित्यनाथ यांना देशातील ३० राज्यांतील जनतेकडून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक मते मिळाली. देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोणाला मानतात, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. यावर ३३ टक्क्यांहून अधिक लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली. या सर्वेक्षणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १३.८ टक्के लोकांनी लोकप्रिय मानले आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यानंतर ते देशातील दुसरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत.
या यादीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ९.१ टक्के लोकांनी पाठिंबा दिला. चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आहेत. त्यांना ४.७ टक्के मते मिळाली. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४.६ टक्के लोकांनी पाठिंबा दिला
या यादीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी आदी यादील खाली आहेत.