मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, ''या'' नेत्याची मोठी मागणी
मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, ''या'' नेत्याची मोठी मागणी
img
दैनिक भ्रमर
नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवप्रेमींची जाहीर  जाहीर माफी मागितली.दरम्यान , काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्स (X) वर प्रतिक्रिया दिली आहे. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी हा काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सततच्या निषेधाचा अन् आक्रमक भूमिकेचा परिणाम आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरंच महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

“मोदी जी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईची ही फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि यांनी केलेला महाराष्ट्रद्रोह विसरणारही नाही. आम्ही महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जय भवानी जय शिवाजी”, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

/div>

इतर बातम्या
Join Whatsapp Group