राज ठाकरे आणि मी एकत्र आलो, तर.... - संभाजी राजे
राज ठाकरे आणि मी एकत्र आलो, तर.... - संभाजी राजे
img
Dipali Ghadwaje
“राज ठाकरे जे बोलतात ते पूर्ण चुकीचं बोलत नाहीत, हे मी मान्य करतो. स्मारकासाठी त्यावेळी 3 हजार कोटी रुपये देतो म्हणले होते. आज ते 15 हजार कोटी रुपये झालेत. उद्या किती होतील?. परवानगी नसताना नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी बोलावलं, फसवण्याचा प्रकार सुरू आहे” अशी टीका संभाजी राजे भोसले यांनी केली.

गड-किल्ले हे जिवंत स्मारकं आहेत, त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. मी सरकारकडे 25 किल्ले दत्तक मागितले आहेत, आम्ही पैसे उभे करतो असं म्हटलं तरी ते द्यायला तयार नाहीत” असं संभाजी राजे म्हणाले.

“राज ठाकरे आणि मी या विषयावर एकत्र आलो, तर महाराष्ट्र गड किल्ल्याच्या विषयाला चांगली दिशा देऊ शकतो” असं संभाजी राजे म्हणाले.

दरम्यान यावेळी  विधानसभेला मनसेसोबत एकत्र येणार का? यावरही संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आमचं वेगळ व्यक्तिमत्व आहे, एकत्र येऊ हे नाकारू शकत नाही. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला हे चांगली गोष्ट आहे. त्यांची ताकद आहे. आमची सुरुवात आहे, म्हणून आम्ही महाशक्ती निर्माण केली आहे, प्रस्थापितांपेक्षा आम्ही विस्थापितांना तिकीट देऊ, प्रस्थापित लोक आले तर त्यांना स्वीकारू  सुद्धा. महाशक्तीमुळे वातावरण बदलायला लागलं आहे, चैतन्य निर्माण झालं आहे. त्यांना चांगला पर्याय मिळत आहे” असं संभाजी राजे म्हणाले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group