उमेदवाराने मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट पाठवली नोटीस ; नेमकं प्रकरण काय? वाचा
उमेदवाराने मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट पाठवली नोटीस ; नेमकं प्रकरण काय? वाचा
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. प्रचारसभांचा धुरळा सुरू आहे. अशातच पुण्यातील मनसे उमेदवार एका मुलांची परीक्षा फी भरल्यामुळे अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मनसेचे कसबा पेठचे उमेदवार गणेश भोकरे यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील मुलांची परीक्षेची फी भरली, म्हणून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

निवडणुकी काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत. असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. फी भरून जर मी काही चूक केली असेल तर असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार असल्याचे भोकरे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं.

 काय म्हणाले  गणेश भोकरे?

जी लोक काम करत नाहीत त्यांच्यावर कुठले गुन्हे नसतात, मी काम करतो तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले. पुण्यातील एस एस पी एम या शाळेमध्ये पात्रे भाऊ शिकतात. एक आठवीला आणि एक नववीला आहे. शाळेने त्यांना 75 हजार रुपये फी भरा असं सांगितलं होतं. मात्र घरची परिस्थिती नसल्याने ते फी भरू शकत नाहीत.

शाळेने त्यांना शाळेतून फी भरण्याचा तगादा लावला. पात्रे यांनी मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती सांगितली. यावेळी भोकरे हे मुलांना घेऊन शाळेत गेले व शाळेला दोन्ही मुलांचे वीस हजार रुपये फी भरली . शाळेची फी भरली म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गणेश भोकरे यांना हा खर्च निवडणूक खर्चात धरला जाईल, याबाबतची नोटीस पाठवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group