बनावट औषध पुरवठा प्रकरणात धक्कादायक खुलासा ;
बनावट औषध पुरवठा प्रकरणात धक्कादायक खुलासा ; "ही" माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
 बीड : अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा  पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे.

यानंतर राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

राज्यात शासकीय संस्थांमध्ये अप्रमाणित औषधे येत असल्याची बाब जानेवारी 2024 पासूनच समोर यायला सुरुवात झाली होती. हे सत्र सुरू झाल्यानंतर औषध विभागाला जाग आली. यानंतर याबाबत पडताळणीची मोहीम सुरू करण्यात आली. या पडताळणीतून अस्तित्वात नसलेल्या पाच बोगस कंपन्यांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आली.

या औषधांवर उत्पादक म्हणून केरळ, उत्तराखंड, आंध्र प्रदेशच्या कंपन्यांची नावे होती. औषध विभागाने त्या त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांकडून माहिती मागवल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच नसल्याचे निदर्शनास आले होते.

औषध विभागाचे आयुक्त डी. आर. गव्हाणे यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी पत्र काढून 5 बनावट कंपन्यांची नावे देऊन या कंपन्यांकडून औषध पुरवठा कुठे झालाय, याबाबत माहिती मागवली होती. 

या आहेत पाच कंपन्या बनावट

1) म्रिस्टल फॉम्र्युलेशन, उत्तराखंड

2) रिफंट फार्मा, केरळ 

3) कॉम्युलेशन, आंध्र प्रदेश

4) मेलवॉन बायोसायन्सेस, केरळ

5) एसएमएन लॅब, उत्तराखंड
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group