मोठी बातमी : बेछूट गोळीबारात २२ जणांचा मृत्यू, ५०-६० नागरिक जमखी
मोठी बातमी : बेछूट गोळीबारात २२ जणांचा मृत्यू, ५०-६० नागरिक जमखी
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. लुईस्टनमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ५०-६० लोक गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. तर रॉबर्ट कार्ड (४० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. कार्ड हा यूएस रिझर्व्ह आर्मीचा देखील सदस्य आहे. 

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो प्रसिद्ध केला असून लोकांकडून मदत मागितली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये लांब शर्ट आणि जीन्स घातलेला एक दाढीवाला व्यक्ती फायरिंग रायफल हातात धरलेला दिसत आहे.  

लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, या मास फायरिंगच्या घटनेत लोक जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
फायरिंगची २०२२ नंतरची सर्वात मोठी घटना
अमेरिकेच्या फायरिंगच्या घटना चिंतेचा विषय आहे. लुईस्टनमधील हल्ला हा २०२२ सालानंतरचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत गोळीबाराची घटना घडली होती. ज्यामध्ये दोन शिक्षकांसह १९ मुलांचा मृत्यू झाला होता. एका अहवालानुसार, २०२२ मध्ये अमेरिकेत गोळीबाराशी संबंधित ६४७ घटनांची नोंद झाली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group