काय सांगता ...!  300 रुपयांचे दागिने चक्क 6 कोटींना विकले, कुठे घडला धक्कादायक प्रकार?
काय सांगता ...! 300 रुपयांचे दागिने चक्क 6 कोटींना विकले, कुठे घडला धक्कादायक प्रकार?
img
Dipali Ghadwaje
जयपूर : जगातल्या कोणत्याही भागातील महिलांना दागिन्यांचं आकर्षण असतं. वेगवेगळ्या प्रकारची दागिने खरेदी करण्याकडं महिलांचा ओढा असतो. ते दागिने खरेदी करण्यासाठी ते पैसे जमा करतात. महिलांच्या याच आवडीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार देखील नवे नाहीत. अमेरिकन महिलेला देखील असाच अनुभव आलाय. या महिलेनं तिला 300 रुपयांचे खोटे दागिने 6 कोटींना विकले अशी तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली असून अतिशय हैराण करणारी आहे. तेथील एका दुकानदाराने एका अमेरिकन महिलेला गंडा घातलाय, त्याने अवघे 300 रुपयांचे दागिने 6 कोटी रुपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  

अमेरिकन नागरिक चेरिश यांनी जयपूरच्या जोहरी बाजारातून गोल्डन पॉलिशमधील चांदीचे दागिने खरेदी केले. मात्र हे दागिने जेव्हा अमेरिकेतील एक प्रदर्शनात ठेवण्यात आल्यावर मात्र धक्कादायक माहिती उघड होती. ते दागिने खरे नव्हते तर चक्क बनावट असल्याचे उघडकीस आले. 

मात्र हे समजल्यावर चेरिश या भारत परत आल्या आणि त्यांनी दुकानदार, गौरव सोनी याला जाब विचारला मात्र त्याने चक्क कानावर हात ठेवले. दुकानमालकाने त्यांचे आरोप थेट फेटाळून लावले. यामुळे संतापलेल्या चेरिश यांनी जयपूर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. एवढंच नव्हे तर चेरिश यांनी याप्रकरणी अमेरिकन दूतावासाकडूनही मदतीची मागणी केली आहे. त्यानंतर अमेरिकन दूतावासाने जयपूर पोलिसांशी संपर्क साधून चेरिश यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नेमकं काय घडले? 

मूळच्या अमेरिकेत राहणाऱ्या चेरिश या भारतात काही दिवस फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी राजस्थानमधील जयपूरच्या जोहरी बाजारातून त्यांनी काही दागिने खरेदी केले. तब्बल 6 कोटी रुपयांना त्यांनी दागिने विकत घेतले. नंतर अमेरिकेला परत गेल्यावर त्यांनी हे दागिने एका प्रदर्शनात ठेवले, मात्र तेव्हा ते दागिने बनावट असल्याचे उघडकीस आल्याने चेरिश यांना धक्का बसला.

2022 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या गौरव सोनीच्या संपर्कात आल्या. गेल्या दोन वर्षांत त्यांनी गौरव सोनी यांना बनावट दागिन्यांच्या बदल्यात २ कोटी रुपये दिले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अतिरिक्त सीपी बजरंग सिंग यांनी सांगितले की, जयपूर येथील एका ज्वेलर्स पिता-पुत्राने एका अमेरिकन नागरिक महिलेला 6 कोटी रुपयांचे बनावट दागिने विकले.सध्या आरोपी गौरव सोनी आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी हे दोघेही फरार आहेत. तसेच गौरवची पत्नी आणि मुलेही फरार आहेत. गौरव सोनी यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

चेरिश या गौरव सोनी आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी यांच्यासोबत हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करत असे. फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांनी अमेरिकेत एक प्रदर्शन भरवले. तेथे दागिन्यांची तपासणी केली जात होती, त्यावेळी काही दागिन्यांची तपासणी केली.मात्र तेव्हा दागिन्यांचे सोनं 9 कॅरेटचे असल्याचे उघडकीस आलं. पण हॉलमार्क पेपरमध्ये तर 14 कॅरेट असल्याचे लिहिले होते. ते दागिने बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर चेरिश ही जयपूरला आली आणि त्यांनी गौरव सोनी यांना दागिने बदलून देण्याची विनंती केली, 

परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. चेरिश यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला, मात्र दुकानदाराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गौरव सोनी आणि त्याच्या वडिलांनी तिला रोखल्याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवला आणि चेरिशने त्यांचे दुकान लुटल्याचा आरोप केला. पोलिसांनी याची चौकशी केली असता चेरिशकडे सर्व बिलं आणि पुरावे होते. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.

त्यानंतर चेरिश हिने अमेरिकन दूतावासाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला, त्यानंतर सोनी व त्यांच्या मुलाने चेरिश हिला 3 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आणि दोन दिवसांचा अवधी मागून घेतला. मात्र त्यानंतर पिता-पुत्र दोघांनीही मोबाईल बंद केला आणि ते फरार झाले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group