दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग; ३ डबे जळून खाक
दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग; ३ डबे जळून खाक
img
दैनिक भ्रमर
उत्तरप्रदेश मधील इटावा जिल्ह्यात सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग लागली. या आगीत ३ बोगी जळून पूर्ण खाक झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सराय भूपत स्टेशनला ट्रेन जात असताना स्टेशन मास्तरने स्लिपर कोचमध्ये धूर पाहिला होता. स्टेशन मास्तरने वॉकी टॉकीच्या मदतीने ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला कळविले. यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

इटावा येथून ही गाडी नवी दिल्लीसाठी रवाना झाली होती. या दरम्यान ट्रेनला भीषण आग लागली. या आगीत जनरल डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला आहे.. काही प्रवाशांनी ट्रेनखाली उड्या मारुन आपला जीव वाचवला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group