आम आदमी पार्टीने राघव चढ्ढा यांना परत एकदा मोठी जबाबदारी दिलीय. राघव चढ्ढा यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्यसभेत आपचा नेते संजय सिंह यांच्यावर या पदाची जबाबदारी होती. परंतु दारू धोरणाच्या कथित घोटाळ्यात संजय सिंह यांना तुरुंगवारी करावी लागली. यामुळे त्यांच्या जागेवर चढ्ढा यांची नियुक्ती करण्यात आलीय.
गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. परंतु मोठ्या वादानंतर चढ्ढा यांना परत त्यांची सदस्यता देण्यात आली होती. राज्यसभेतील त्यांचे निलंबन संपल्यानंतर राघव चढ्ढा यांनी व्हिडिओ जारी करून लोकांचे आभार मानले होते. एक अतिशय भावूक व्हिडिओ जारी करत त्यांनी नागरिकांचे आभार मानले होते.
राघव चढ्ढा यांची भावनिक पोस्ट
मी ११५ दिवस लोकांचा आवाज संसदेत ठेवू शकलो नाही. ११ ऑगस्ट रोजी मला राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. म्हणजेच भारताच्या संसदेतून मला निलंबित करण्यात आलं होतं. मी आपल्या निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्याय मंदिरात जाऊन मला न्याय मागावा लागला, असं चढ्ढा या व्हिडिओत म्हणाले होते.