मराठी सक्तीचा वाद पेटला! शिंदे गटातील 'विसंवादा'वर संजय राऊतांनी बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना घेरलं
मराठी सक्तीचा वाद पेटला! शिंदे गटातील 'विसंवादा'वर संजय राऊतांनी बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना घेरलं
img
नितीशा कुलकर्णी




नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठी सक्तीविषयी सविस्तर मत मांडलं. इतकेच नाही तर त्यांनी शिंदे गटातील मतभेदांवर प्रकाश टाकला.

मराठी भाषेच्या सक्तीवरून सध्या राज्यात राजकीय वावटळ उठली असतानाच, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील अंतर्गत विसंवादावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय निरुपम यांच्या विरोधाचा दाखला देत, 'शिंदे आणि फडणवीसांनी आता आपली भूमिका ठामपणे मांडावी', असे सांगत राऊत यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले राऊत ?

‘महाराष्ट्रा्च्या रिक्षा चालकांना मराठी आलंच पाहिजे अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे. पण शिंदे गाटतूनच (संजय निरूपम) यांचा या सक्तीला विरोध आहे. त्यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ” मराठी सक्तीची भूमिका योग्य आहे, असं एकनाथ शिंदे, फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून हे लोक कसे काय राहू शकतात?. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. त्या त्या राज्यातील मातृभाषेत काम झालं पाहिजे. महाराष्ट्रातही तुम्हाला मराठी आलंच पाहिजे.”

इतर बातम्या
Join Whatsapp Group