'मराठी सक्ती'वरून संघर्ष पेटणार! सरकार आपल्या निर्णयावर ठाम, तर रिक्षाचालक आंदोलनाच्या तयारीत; काय होणार पुढे?
'मराठी सक्ती'वरून संघर्ष पेटणार! सरकार आपल्या निर्णयावर ठाम, तर रिक्षाचालक आंदोलनाच्या तयारीत; काय होणार पुढे?
img
नितीशा कुलकर्णी




जर तुम्हाला महाराष्टत व्यसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवी या सरतारच्या निर्णयाची सध्या सगळी कडेच चर्चा सुरू आहे. अगदी रिक्षा-टॅक्सी चालकांना देखील मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारणे घेतला आहे. सरकारच्या हा निर्णय योग्यच असल्याचं बॉलिवूड अभिनेत्यांनेही म्हटलं आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला पाहायला मिळतो आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारने  निर्णय घेतला आहे. रिक्षा युनियनने याला विरोध केला आहे. याबाबत राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहे.

मराठी अभिनेत्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्यानेही सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र सरकारने 1 मेपासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक केलं आहे. 59 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) याची पडताळणी केली जाईल.

ज्या चालकांना मराठी येणार नाही, त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाच्या विरोधात रिक्षा-टॅक्सी युनियनने 4 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

युनियनचे नेते शशांक राव यांचं म्हणणं आहे की, "ओला-उबेर आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर कारवाई होत नाही, पण मराठीच्या नावाखाली सामान्य रिक्षाचालकांना टार्गेट केलं जातंय. "जवळपास 15 लाख रिक्षाचालकांना हा नियम मान्य नाही.

28 एप्रिल रोजी युनियनचे प्रतिनिधी प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हे निवेदन देणार आहेत. हा अन्यायकारक नियम मागे घेतला नाही तर 4 मे पासून रेल्वे स्थानकं, बस डेपो आणि रिक्षा स्टँडवर तीव्र आंदोलन छेडलं जाईल", असा इशारा रिक्षाचालकांनी सरकारला दिला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group