पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह एकूण ४३ कार्यकर्त्यांन विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करून त्यांच्या गाडीची काच फोडली होती व त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली होती.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे आरोप पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे वतीने करण्यात आला होता.व पुण्यातील 'निर्भय बनो ' या पुण्यातील दांडेकर पूल येथील सानेगुरुजी येथील कार्यक्रमास्थळी त्यांना येण्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचा विरोध होता.
त्यातूनच काल डेक्कन येथील खंडुजी बाबा चौकात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी पत्रकार वागळे यांची कार फोडून त्यांच्या कारवर शाईफेक करण्यात आली होती.या प्ररकणी पुणे पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे एकूण ४३ कार्यकर्ते यांच्यावर आज गुन्हे दाखल करण्यात आले आहे.