मन सुन्न करणारी घटना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलंलं टोकाचं पाऊल
मन सुन्न करणारी घटना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलंलं टोकाचं पाऊल
img
Dipali Ghadwaje
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 

आरक्षणाची मागणी करत एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , संदिपान आनंदराव चौधरी (वय ४१ वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संदिपान हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगावाचे रहिवासी आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून चौधरी हे मराठा आंदोलनात सहभागी होते. शनिवारी (१७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास त्यांनी वडाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. संदिपान यांच्या निधनाने संपूर्ण अंबड शहरावर शोककळा पसरली आहे. 

संदिपान हे पहिल्या दिवसापासून मराठा आंदोलनात सक्रिय होते. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी चालढकल होत असल्याने ते नैराश्यात गेले होते. राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याची खंत त्यांनी आपल्या मित्रांकडे व्यक्त केली होती.

दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास संदिपान यांनी चिकनगावातील लोणार भायगाव शिवार गट न. 59 मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या रुमालावर एक मराठा लाख मराठा असं वाक्य लिहून ठेवलं.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस पाटील आणि सरपंच यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group